कोर्लई गावातील आश्रम रस्त्याची दुरवस्था
कोर्लई गावातील आश्रम रस्त्याची दुरवस्था
मुरूड, ता. ७ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील बसथांब्यासमोरील सुमारे दीड किमीच्या रस्त्याची गेल्या कित्येक दिवसापासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील एका आश्रमाकडे जाताना ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
येथील शांतीभगिनी आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता कोर्लई बसथांब्यासमोरून जातो. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना या नादुरुस्त रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी. हा रस्ता शांतीभगिनी आश्रमकडे जात असून येथे निवास करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींना खाचखळग्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. तसेच, येथील चर्चमधील सिस्टर्स, आदिवासी वाडी, ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी आदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता जिल्हा परिषदअंतर्गत येत असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

