रोजगाराभिमुख अध्ययन अनुभव देणे काळाची गरज

रोजगाराभिमुख अध्ययन अनुभव देणे काळाची गरज

Published on

रोजगाराभिमुख अध्ययन अनुभव देणे काळाची गरज
गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांचे प्रतिपादन
मुरूड, ता. १८ (बातमीदार) : एकविसाव्या शतकात पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनाभिमुख अध्ययन अनुभव देणे ही काळाची गरज आहे. फूड फेस्टिव्हलसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व गणितीय संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून कळतात. यातून स्वावलंबन व रोजगाराभिमुख कौशल्याचा विकास साधणे शक्य होते, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा, मजगांव मराठी शाळेने क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये फूड फेस्टिव्हचे उद्घाटन सुनील गवळी यांनी केले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
या फूड फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल १४ स्टॉल मांडले होते. यात गुलाब जामून, पुरणपोळी, मोदक, पराठे, सॅण्डवीच, कुरकुरीत भेळ, ज्युस, चायनीज पदार्थ, कुकीज, अंड्याचे पदार्थ, चिकनचे पदार्थ, वडापाव, भजी, हलवा आदी पदार्थांचा समावेश होता.
प्रत्येक स्टॉलचे परीक्षण मुरूड नगरपालिका शाळेच्या शिक्षिका अमृता पोकळ यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हेमकांत गोयजी, स्पर्धाप्रमुख संतोष दहातोंडे तसेच मनीषा वाघरे, चेतन चव्हाण, प्रमिला फुंदे व हर्षा नांदगांवकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निखिल मानाजी, उपाध्यक्ष उमेश कोंडाजी, योगेंद्र गोयजी यांनी सहकार्य केले.

सोबत - फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com