मुरूड शहरात भव्य शोभा यात्रा

मुरूड शहरात भव्य शोभा यात्रा

Published on

मुरूड शहरात भव्य शोभा यात्रा
मुरुड, ता. १५ (बातमीदार) ः मुरूड तालुका बौद्ध समाज सेवा संघ केंद्रीय समिती आणि स्थानिक तालुका समिती तसेच विभागीय शाखा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि धम्म संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुरूड अलकापुरी येथील स्मारकाजवळ धम्म ध्वजारोहण व ध्वजवंदना करण्यात आले. तद्नंतर सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य पद यात्रा व बाईक रॅली काढण्यात आली. ही मिरवणूक रॅली डॉ. आंबेडकर स्मारक अलकापुरी, रणदिवे आळी, गोल बंगला, बाजारपेठ, नगरपरिषद कार्यालय, मारुती नाका आणि दरबार हॉलपर्यंत फटक्यांची आतशबाजी करत बेंजोच्या तालावर काढण्यात आली. यावेळी केंद्रीय समिती अध्यक्ष किशोर शिंदे, सचिव प्रदीप उमटेकर, स्थानिक तालुका समिती अध्यक्ष सुरेश मोरे, सचिव धर्मेश मोरे, स्मारक समिती अध्यक्ष मनोहर तांबे, सचिव मंगेश येलवे, धम्म संस्कार समिती अध्यक्ष सुभाष मोरे, सचिव - वसंत सोरे, नामदेव गायकवाड, सचिव गौतम मोरे, नरेंद्र जाधव, उप सचिव लताताई दाभणे, जनार्दन शिंदे, सचिव प्रकाश जाधव शेकडो अनुयायी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com