मुरुड नगरपरिषदतर्फे १५ टक्के घरपट्टी वाढ

मुरुड नगरपरिषदतर्फे १५ टक्के घरपट्टी वाढ
Published on

मुरूड नगर परिषदतर्फे १५ टक्के घरपट्टीवाढ
मुरूड, ता. २४ (बातमीदार) ः मुरूड नगर परिषदेने घरपट्टीवाढीसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. शहरात सात टीम गठित करून संपूर्ण शहरातील घरांचे मोजमाप पूर्ण करण्यात येणार असून, १५ टक्के घरपट्टीवाढ करण्यात येणार असल्याची माहिती मुरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी दिली.
याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मागील चार वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते, परंतु निवडणूक कामामुळे हे काम स्थगित ठेवण्यात आले होते. आता पुन्हा ही मोहीम हाती घेण्यात आली असून, सर्वेक्षणाचे काम दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येऊन घरपट्टी आकारणी मोहीम सुरू होणार आहे. या वेळी त्यांनी सांगितले की, मुरूड शहरातील जी घरे ५० वर्षांपूर्वीची आहेत, त्यांना घरपट्टीमध्ये ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. जी घरे ५० वर्षाच्या आतील असतील त्यांना १५ टक्के घरपट्टीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. घरपट्टी ही दर चार वर्षांनंतर नव्या दरात आकारणी करण्याची प्रक्रिया करण्यात येत असते. त्याप्रमाणे ही आकारणी करण्यात येणार आहे. सध्या पाणीपट्टीमध्ये १५ टक्के वाढदेखील करण्यात आली आहे. २०२४-२५ वर्षामध्ये मुरूड नगर परिषदेत एक कोटी २८ लाख ८९ हजार आठशे रुपये जमा झाले आहेत. मार्च अखेरपर्यंत मुरूड नगर परिषदेने ८३ टक्के घरपट्टी वसूल केली आहे, तर पाणीपट्टी ८४ टक्के वसूल झाली असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com