काशीद समुद्र किनारी बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

काशीद समुद्र किनारी बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Published on

काशीद समुद्रकिनारी बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
मुरुड, ता. ३ (बातमीदार) : मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी मंगळवारी (ता. १) समुद्रात पोहण्यास उतरलेल्या चार युवकांपैकी तनिष्क मल्होत्रा (वय २०) पाण्यात वाहून गेला होता. अखेर ४८ तासांनंतर गुरुवारी (ता. ३) त्याचा मृतदेह काशीद समुद्रकिनारी सापडला आहे. बुडाल्याची घटना कळताच तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मुरुड पोलिसांनी थर्मल ड्रोन, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर तसेच अन्य तत्सम मदत घेऊन शोधकार्य सुरू होते. अखेर गुरुवारी तनिष्कचा मृतदेह काशीद समुद्रकिनारी आढळून आला. तनिष्क हा डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com