मुरुड एसटी आगारात सीएनजी गॅसअभावी गैरसोय
मुरुड एसटी आगारात सीएनजी गॅसअभावी गैरसोय
गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांमध्ये नाराजी
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप नसल्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत आहे. सर्व गाड्यांना अलिबाग येथे सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे गॅस भरण्याच्या प्रक्रियेत अर्धा ते पाऊण तास अतिरिक्त वेळ जातो. परिणामी बसेस वेळेवर इच्छितस्थळी पोहोचत नाहीत. या उशिरामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि चिडचिड वाढत आहे.
कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूडमध्ये देशभरातून पर्यटक वर्षभर भेट देतात. ऐतिहासिक जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग, स्वच्छ समुद्रकिनारा, ताजी मासळी आणि खास कोकणी मावा चाखण्यासाठी पर्यटकांचा ओघ सतत सुरू असतो. मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, पुणे, शिर्डी, धुळे इत्यादी ठिकाणांहून एसटी महामंडळाच्या बसेस मुरूडमध्ये येत असल्याने स्वतःची वाहने नसलेले पर्यटक एसटी सेवा हा सुरक्षित पर्याय म्हणून निवडतात. मात्र मुरुड आगारात अद्याप सीएनजी गॅस पंप उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुरूड आगारात सध्या सुमारे ४० बसगाड्या कार्यरत आहेत. यामधील नुकत्याच दाखल झालेल्या पाच नवीन बसेस वगळता उर्वरित सर्व गाड्यांना अलिबाग येथे सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे गॅस भरण्याच्या प्रक्रियेत अर्धा ते पाऊण तास अतिरिक्त वेळ जातो. परिणामी बसेस वेळेवर गंतव्यस्थळी पोहोचत नाहीत. या उशिरामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि चिडचिड वाढत आहे. स्थानिक नागरिक, व्यापारीवर्ग व पर्यटक यांच्यातून सध्या ही मागणी अधिक तीव्र होत आहे. मुरूड एसटी आगारात लवकरात लवकर सीएनजी गॅस पंप सुरू करावा, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय दूर होईल आणि एसटीच्या फेऱ्याही वेळेवर सुरू राहतील, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
............
गेल्या महिन्यात मुरूड आगारासाठी पाच नव्या लाल परींचा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी पावसाळी अधिवेशनात मुरूड आगारासाठी भांडवली तरतूद करून सीएनजी गॅस युनिट मंजूर करून घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र अद्याप प्रत्यक्ष कृती झालेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे शिष्टमंडळासह भेट देत ही मागणी लावून धरली होती. त्यांनीदेखील मुरूडसारख्या पर्यटन नगरीसाठी सीएनजी पंप गरजेचा असल्याचे मान्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.