

म्हसळा, ता. ३ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडून स्थानिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. हरिहरेश्वर येथे एका महिलेचा मृत्यू झाला असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या म्हसळ्यातील तरुणाला मद्यधुंद पर्यटकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
माणगाव येथून म्हसळा येथे जाणाऱ्या घोनसे घाटात ओव्हरटेक करण्यावरून दोन गटांत भांडण सुरू होते. याचवेळी सलीम घंसार हा तरुण रात्री नऊच्या सुमारास घरी जात होता. शांत स्वभावाचा सलीम झालेल्या प्रकारात मध्यस्थी करण्यासाठी गेला; पण गाडीतील मद्यधुंद पर्यटकांनी सलीमलाच रस्त्यावर पाडून दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सलीमला रस्त्यावरच टाकून पर्यटकांनी माणगावच्या दिशेने पळ काढला; मात्र माणगाव पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. सलीमच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला म्हसळा येथून नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
-----------------------------
पुणेकरांवर बंदीचा इशारा
पर्यटकांकडून स्थानिकांवर हल्ले होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यात विशेष करून पुणे परिसरातील पर्यटकांकडून अरेरावी केली जात असल्याचे अनेकदा निर्दशनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुण्यातील पर्यटकांना म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यात येण्यास बंदी घालण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.