देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन म्हसळ्यात भर पावसात संपन्न.
भरपावसात स्वातंत्र्य दिन म्हसळ्यात साजरा
म्हसळा, ता. १५ (बातमीदार) ः तालुक्यात गुरुवारी (ता. १४) रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता. या पावसातही तालुकावासियांनी शुक्रवारी (ता. १६) मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर, पंचायत समिती म्हसळा येथील गटविकास अधिकारी माधव जाधव, नगरपंचायत येथे नगराध्यक्ष संजय कर्णिक, वसंतराव नाईक महाविद्यालयातील विश्वस्त सचिव प्रतिनिधी फझल हलदे, आयडियल हायस्कूल येथे नाजीम हसवारे,अंजुमन हायस्कूल येथे नसिर मिठागरे तर मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते कन्याशाळेच्या प्रांगणात झाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्ताने म्हसळा शहरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. नृत्य सादरीकरणामध्ये प्रथम क्रमांक व्हिजन स्कूलने पटकाविला. तर गीत गायनमध्ये प्रथम क्रमांक नाईक अंतुले महाविद्यालयाने पटकाविला.
याप्रसंगी महसूल नायब तहसीलदार डॉ. मृणाली शिरसाट, पोलिस निरीक्षक संदीप कहाळे, मंडळ अधिकारी सलीम शहा, निवडणूक नायब तहसीलदार संध्या अंबुर्ले, पत्रकार संघटना अध्यक्ष शशिकांत शिर्के, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, माजी सभापती महादेव पाटील, हिरामण चव्हाण, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, बाबू पाटील, अजय करंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो -१)भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण करताना तहसीलदार सचिन खाडे. (छाया - उदय कळस )
२) ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना तहसीलदार सचिन खाडे (छाया -उदय कळस )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.