साळविंडे ग्रामपंचायतीत महाश्रमदानातून स्वच्छता मोहीम
साळविंडे ग्रामपंचायतीत महाश्रमदानातून स्वच्छता मोहीम
म्हसळा, ता. २४ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील साळविंडे ग्रामपंचायत हद्दीत महाश्रमदानाच्या माध्यमातून व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रातील गाव, वाडी व वस्त्यांमध्ये ही मोहीम उत्साहात पार पडली. या उपक्रमामुळे गावाच्या स्वच्छता व आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयीची जाणीव अधिक बळकट झाली आहे.
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत साळविंडे गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, गावाच्या आजूबाजूचा परिसर तसेच वैयक्तिक घरांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा, प्लॅस्टिक, झाडाझुडपे काढून परिसर स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला. महाश्रमदानाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले. या मोहिमेत साळविंडे ग्रामपंचायतीचे सरपंच उद्देश सखाराम पारदुले, उपसरपंच जागृती जगदीश सावंत तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यासोबतच साळविंडे हद्दीतील विविध गाव, वाडी व वस्त्यांमधील पुरूष व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. कार्यक्रमास पंचायत समिती म्हसळाचे गटविकास अधिकारी माधव जाधव, विस्तार अधिकारी दिघीकर तसेच तालुका स्वच्छता समन्वयक अमित तोंडलेकर हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, केवळ एक दिवस नव्हे तर दररोज स्वच्छतेची सवय अंगीकारण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

