म्हसळा पंचायत समितीत शिवजयंती उत्साहात
म्हसळा पंचायत समितीत शिवजयंती उत्साहात
म्हसळा, ता. १९ (बातमीदार) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हसळा पंचायत समिती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. गटविकास अधिकारी माधव जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विस्तार अधिकारी दामोदर दिघीकर, चंद्रसेन चौधरी, रमेश दवटे, प्रसाद कुरळे, सचिन बोराडे, प्रमोद शिरसाठ, ज्ञानेश्वर झोल, कैलास नागरगोजे, विशाल तळेकर, रमेश खोसे, सखाराम बहिर, नीलेश शेळके, कृष्णा पांडुळे आदी उपस्थित होते. शिवरायांनी अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या गुणांचे आत्मसात केल्यास राष्ट्रासाठी आदर्श कार्य करता येईल, असे प्रतिपादन माधव जाधव यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

