म्हसळा शहरात स्वच्छता मोहीम
म्हसळा शहरात स्वच्छता मोहीम
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार
म्हसळा, ता. १ (बातमीदार) : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त म्हसळा शहरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी व राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजल्यापासून शेकडो स्वयंसेवकांनी शहर स्वच्छ करण्यासाठी कामाला सुरुवात केली.
म्हसळा पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलिस ठाणे परिसर, म्हसळा-दिघी रोड तसेच पाभरे फाटा या प्रमुख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष अनिकेत पानसरे, पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे, स्वच्छता विभागाचे कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोहिमेसाठी ट्रॅक्टर, चार डम्पर व कचरा गाड्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती.
या अभियानात ३४८ स्वयंसेवकांनी सहभाग घेत ५,३०० चौ. फूट शासकीय कार्यालय परिसर व २.१ किमी मुख्य रस्ते स्वच्छ केले. तसेच ५,२५० किलो सुका व ५०० किलो ओला कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात आली.
चौकट
स्वच्छतेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेबाबत जनजागृती करत नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. शिस्तबद्ध नियोजन, मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळ आणि स्थानिक प्रशासनाचा सहभाग यामुळे हा उपक्रम तालुक्यासाठी आदर्श ठरला.
फोटो -आज म्हसळा शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शहराची स्वच्छता करीत असताना श्रीसदस्य. (छाया -उदय कळस )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

