म्हसळ्यात नारीशक्तीचा अभूतपूर्व गौरव सॊहळा-

म्हसळ्यात नारीशक्तीचा अभूतपूर्व गौरव सॊहळा-

Published on

म्हसळ्यात नारीशक्तीचा अभूतपूर्व गौरव सोहळा
म्हसळा, ता. १० (बातमीदार) ः महिला दिनाचे औचित्य साधून श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या वतीने म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात नारीशक्ती गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी, हॉटेल व्यावसायिक मुकेश रायका, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र लाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमित महामुनकर, नगरसेविका राखी करंबे, क्षमा नागवेकर, मोहिनी शिर्सेकर, मोहिनी पाटील, प्रमिला शेळके, भिमराव सूर्यतळ, माजी तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, माजी तालुकाप्रमुख बाबू बनकर, ठाकरे गटाचे युवा अधिकारी कौस्तुभ करडे, नरेश विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शिक्षिका संगीता आंबेडकर, यशस्वी उद्योजिका लक्ष्मी केंद्रे, वाहक वैशाली राठोड, आरोग्य सेविका ज्योती महाडिक, डॉ. श्रद्धा पाटील, केंद्रीय शिक्षिका सुनीता सोळंखी, आशा सेविका सुविधा म्हशीलकर, माध्यमिक शिक्षिका संगीता शिर्के, प्रतीक्षा कानवडे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मानसी दळवी म्हणाल्या की, कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नसून त्या अग्रेसर आहेत. महिलांचे सक्ष्मीकरण होणे अत्यावश्यक असून, शासनाने फक्त महिलांसाठी विशेष योजना राबविणे अत्यावश्यक आहे. जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले आणि समृद्ध महाराष्ट्र सक्षम झाला, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संतोष उद्धरकर यांनी केले.


फोटो -
म्हसळा ः मानसी दळवी यांचा सत्कार करताना रवींद्र लाड सोबत मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com