वारळमध्ये राष्ट्रवादीला खिंडार... गुरुदत्त मंडळ मोठी आळी यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश. उदय कळस
वारळमध्ये राष्ट्रवादीला खिंडार
गुरुदत्त मंडळ मोठी आळी यांचा शिवसेनेत प्रवेश
म्हसळा, ता. २२ (बातमीदार) ः अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने एकत्र येत रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली, परंतु स्थानिक राजकारणात महायुतीत मतभेद असल्याचे उघड झाले आहे. म्हसळा तालुक्यातील वारळ गावात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. गुरुदत्त मंडळातील ग्रामस्थांनी व विद्यमान तीन ग्रामपंचायत सदस्य आणि सकलप सुतार समाज मंडळ यांनी राष्ट्रवादीला साथ सोडत देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यासाठी युवासेना तालुकाप्रमुख महेश पाटील आणि नामदेव घुमकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपा कार्यकर्ते नोद कांबळी, वारळ ग्रामपंचायत सदस्य व मंडळाचे सल्लागार जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते दामोदर पाटील, उपाध्यक्ष रमेश हिराजी म्हात्रे, मार्गदर्शक रमेश धोंडू वारळकर, माजी सरपंच निर्मला म्हात्रे, महिला मंडळ अध्यक्षा मालती कविलकर, खजिनदार शारदा विनोद कांबळी, पार्वतीबाई बिराडी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी तालुकाप्रमुख अमित महामुणकर, महिला तालुकाप्रमुख गौरी करडे, माजी तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, बाबू बनकर, नगरसेविका राखी करंबे यांच्यासह शिवसेना म्हसळा तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

