

म्हसळा तालुक्यात एसआरआय मॅपिंगला वेग
६० ते ७० टक्के काम पूर्ण.
म्हसळा, ता. ३० (बातमीदार)ः महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादीतील एसआरआय मॅपिंग प्रक्रियेला म्हसळा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६० ते ७० टक्के मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.
एसआरआय मॅपिंग प्रक्रियेत शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी २००२ च्या मतदार यादीच्या आधारे आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्या नावाशी सध्याच्या मतदार नोंदीचे मॅपिंग करणे आवश्यक आहे.या प्रक्रियेमुळे मतदारांच्या नोंदी अधिक अचूक व सुसंगत होण्यास मदत होत आहे.
मतदारांनी वेळेत एसआरआय मॅपिंग पूर्ण करून घेतल्यास भविष्यातील निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.