

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
म्हसळा, ता. ४ (बातमीदार) ः तालुक्यातील वरवठणे येथे १४ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी ९वीमध्ये शिकत होती. तिची मोबाईलद्वारे दोन अनोळखी मुलांशी ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी ती त्या मुलांशी बोलत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. यावरून आई रागावेल किंवा मारेल, या भीतीपोटी मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.