म्हसळा दिघी नाक्याचे नाव ''छत्रपती शिवाजी महाराज चौक''

म्हसळा दिघी नाक्याचे नाव ''छत्रपती शिवाजी महाराज चौक''
Published on

म्हसळा दिघी नाक्याचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’
खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे नगर पंचायतीचा निर्णय
म्हसळा. ता. २० (बातमीदार)ः म्हसळा शहरातील तमाम शिवप्रेमींचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या ‘दिघी नाका’ याचे नामकरण आता ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे करण्याचा ठराव आज म्हसळा नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
​हिंदू ग्रामस्थ मंडळ म्हसळा, गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान आणि तत्कालीन अखंड शिवसेना यांसारख्या विविध शिवप्रेमी संघटनांनी दिघी नाक्याचे नामकरण करण्याची आग्रही मागणी केली होती. यासंदर्भात तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते संजय प्रभाकर कर्णिक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. कर्णिक यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याशी शिवप्रेमींची भेट घडवून आणली होती. त्या वेळी खासदार तटकरे यांनी दिलेले वचन पूर्ण झाले आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या चौकाचा नामकरण सोहळा साजरा केला जाणार असल्याची चर्चा आहे.

चौकट
​नगर पंचायतीच्या सभेत मोहोर :
​बुधवारी (ता. १५) प्रभारी नगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत नामकरणाचा ठराव मांडण्यात आला आणि तो बहुमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयासाठी नगरसेविका राखी करंबे, जयश्री कापरे, सरोज म्हशीलकर, संजय दिवेकर आणि सुनील शेडगे यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला.

कोट
‘दिघी नाका’ हे नाव पुसून आता त्या ठिकाणी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झळकणार आहे, याचा आम्हा सर्व शिवप्रेमींना सार्थ अभिमान आहे.
- नंदकुमार वसंत गोविलकर, अध्यक्ष, हिंदू ग्रामस्थ मंडळ, म्हसळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com