म्हसळा येथे स्मृतीभवन, प्रयोगशाळेचे लोकार्पण

म्हसळा येथे स्मृतीभवन, प्रयोगशाळेचे लोकार्पण
Published on

म्हसळा येथे स्मृतीभवन, प्रयोगशाळेचे लोकार्पण
आदिती तटकरे यांची उपस्थिती; शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्नांवर भर
म्हसळा, ता. २६ (वार्ताहर) : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतीभवन आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे विज्ञान प्रयोगशाळेचे लोकार्पण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांत यश मिळवून तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी शिक्षकांनी सातत्याने मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, चेअरमन समीर बनकर व प्राचार्य धर्मराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे खासदार सुनिल तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या निधीतून शाळेच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. या निधीतून इमारत दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य, संगणक व प्रयोगशाळा सुविधा उभारण्यात आल्या.
कार्यक्रमास अभयकुमार साळुंखे, वैकुंठ पाटील, पी.एल. हाके, पी.एस. चव्हाण, मुरलीधर गावडे, अनिकेत पानसरे, नाझिम हसवारे, मधुकर गायकर, संदीप चाचले, संजय कर्णिक, जयश्री कापरे, राखी करंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो -न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा येथील स्मृतिभवन आणि विज्ञान प्रयोग शाळेच्या उदघाटन प्रसंगी पाहणी करताना नाम. आदिती तटकरे सोबत मान्यवर (छाया -उदय कळस )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com