विधवा दिनानिमित्त महिलांचा सन्मान

विधवा दिनानिमित्त महिलांचा सन्मान
Published on

विधवा दिनानिमित्त महिलांचा सन्मान
म्हसळा नगर पंचायतीत ‘एकल महिला दिन’
म्हसळा, ता. २३ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त मंगळवारी (ता. २३) म्हसळा नगर पंचायतीत ‘एकल महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच निराधार महिलांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सुपरवायझर साधना प्रसाद पागी यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देत त्यांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यापूर्वी महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष सुनील शेडगे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आणि नगरसेविका राखी करंबे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी म्हसळा नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा सेविकांनी सक्रिय सहकार्य केले. या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com