

म्हसळ्यात कोतवाल भरती
आठ पदांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज
म्हसळा, ता. ६ (बातमीदार) : महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार म्हसळा तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हसळा, खामगाव, मेंदडी, आंबेत-वावे, निगडी, केल्टे व पांगळोली या सजांमधील एकूण आठ पदे भरण्यात येणार आहेत.
इच्छुक पात्र उमेदवारांनी २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून, आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार कार्यालय, म्हसळा येथे प्रत्यक्ष सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
रिक्त पदांमध्ये अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती एक, भ.ज.ड. एक, इतर मागासवर्गीय दोन, एसईबीसी एक, तसेच महिला आरक्षणानुसार वि.जा. एक आणि ईडब्ल्यूएस एक अशा आठ जागांचा समावेश आहे.
भरती प्रक्रियेनुसार १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान अर्ज छाननी, ४ ते १० नोव्हेंबर प्रवेशपत्र वितरण आणि १५ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. १६ नोव्हेंबरला उत्तरसूची व निकाल जाहीर करण्यात येईल. कागदपत्र पडताळणी १७ ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना २८ नोव्हेंबरला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
भरतीची सविस्तर माहिती तहसील कार्यालय म्हसळा व उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवड समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.