खासदारांच्या निर्देशानंतरही तोंडसुरे पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प

खासदारांच्या निर्देशानंतरही तोंडसुरे पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प
Published on: 

खासदारांच्या निर्देशानंतरही तोंडसुरे पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प
म्हसळा, ता. १५ (बातमीदार) : केंद्र व राज्य सरकारच्या ‘हर घर जल’ अभियानांतर्गत जलजीवन मिशनमधून म्हसळा तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, मात्र खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठकीत निर्देश देऊनही तोंडसुरे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाभरे धरणातील जलस्रोत निश्चित करण्यात आला असून, तोंडसुरे प्रादेशिक योजनेतून खरसई धरण प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनांमुळे तालुक्यातील पाणीप्रश्न सुटण्याची अपेक्षा असताना कामांतील दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाबाबतच्या तक्रारींमुळे नागरिकांची निराशा झाली आहे.
खासदार तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक निर्देश देऊनही योजनेचे काम सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही योजनांची कामे संथ गतीने सुरू असून, निधीअभावीही अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
यंदा कमी पर्जन्यमानामुळे संभाव्य पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. त्यामुळे रखडलेल्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, सदोष कामांची तांत्रिक तपासणी करावी आणि दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी म्हसळा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com