आमदार नरेंद्र मेहता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

आमदार नरेंद्र मेहता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Published on: 

आमदार मेहता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
बेकायदा बांधकाम परवानगी घेतल्याचा आरोप
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता आणखी एका जमीन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्या मालकीच्या जमिनीवर मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने बेकायदा बांधकाम परवानगी घेतल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. नरेंद्र मेहता यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र असगरअली वोहरा यांची भाईंदर येथील जमीन मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने हडपल्याची तक्रार त्यांनी मोदींकडे केली होती. त्यानंतर अचानक चक्रे फिरली आणि वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करीत असल्याचे मेहता यांनी जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा मेहता यांच्या कंपनीशी संबंधित मिरा रोड येथील एका जमिनीचा वाद उद्भवला आहे.
सर्व्हे क्र. ५३५/२ ही जमीन एलिव्हेशन प्रोजेक्ट या आपल्या कंपनीच्या मालकीची असून, त्याची रीतसर खरेदी आपण केली आहे. मात्र आपल्या जमिनीच्या लगत असलेल्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर मिरा-भाईंदर महापालिकेकडून देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीमध्ये आपल्या जमिनीचा सर्वे क्रमांकही नमूद करण्यात आल्याचा आरोप सोहन कंवर या महिलेने केला आहे. याप्रकरणी मिरा-भाईंदर महापालिका, पोलिस प्रशासन, महसूल विभाग या सर्वांकडे तक्रार केल्यानंतरही न्याय मिळाला नाही. सेव्हन इलेव्हन कंपनीला दिलेल्या बांधकाम परवानगीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची महापालिकेकडे मागणी केल्यानंतरही कागदपत्रे दिली जात नसल्याची माहिती सोहन कंवर यांनी दिली.

आरोप फेटाळला
नरेंद्र मेहता यांनी मात्र हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. महापालिकेने सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकीच्या जागेसाठीच बांधकाम परवानगी दिली आहे. लगतच्या कंवर यांच्या जमिनीसह परिसरातील सर्वच जमिनीसाठी एकच लेआऊट नकाशा मंजूर आहे. त्यामुळे त्या जमिनींवरील विविध बांधकाम परवानग्यांमध्ये सर्वच सर्व्हे क्रमांकाचा उल्लेख केला जातो. त्यानुसार आपल्या कंपनीच्या बांधकाम परवानगीतही कंवर यांच्या जमिनीच्या सर्व्हे क्रमांकाचा केवळ संदर्भासाठी उल्लेख आला आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या जमिनीचा आपल्या बांधकाम परवानगीशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा मेहता यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com