

भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनुचित प्रकार टळला
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सोमवारी (ता. २) आमनेसामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला.
मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. महापालिकेच्या महासभेत भाजप नगरसेवकांकडून नागरिक आणि पत्रकारांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाने गेल्या आठवड्यात भाजप नगरसेवकांच्या प्रभागांत आंदोलने केली होती. या आंदोलनांना प्रत्युत्तर म्हणून भाजपने सोमवारी सायंकाळी भाईंदर पूर्वेतील नवघर नाका आणि मिरा रोड येथे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात आंदोलन केले. नवघर नाका येथे भाजपचे आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात आरसे घेऊन भाजपला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. भाजपच्या इशाऱ्यावर पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
....
सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आणि जनतेच्या हक्कांसाठी आंदोलन केल्याचे भाजपने सांगितले. सरनाईक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही या वेळा करण्यात आली. तर महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराचा आरसा दाखवण्यासाठी आंदोलन केल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.