माथेरानच्या खोंडा गावाची तहान भागली

माथेरानच्या खोंडा गावाची तहान भागली

अजय कदम, माथेरान
माथेरान डोंगरावरील घनदाट जंगलात वसलेल्या खोंडा गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून पायपीट करत पाणी आणावे लागत होते. ही समस्या माथेरानमधील मजुरी आणि हॉटेल कामगार असलेल्या गावातील आदिवासी बांधवांनी कॅरेन फ्रेंड या संस्थेसमोर मांडली. या संस्थेने त्वरित गावासाठी जलवाहिनीद्वारे पाणी सुरू करून खोंडा गावाची तहान भागवली आहे.
माथेरानमध्ये जंगल भागात खोंडे गावाची ९५ घरांची वस्ती आहे. येथी आदिवासी बांधवांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. जोखीम पत्करून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून पाणी शोधण्यासाठी त्यांना जावे लागत होते. डोंगरातील दगडातून निघणारे पाणी साठवून हे लोक पाणी आपल्या घरी न्यायचे. त्यात माथेरान शहरात रोजगार कमावून घरी परतल्यावर हेच आदिवासी लोक हंडे घेवून पाणी शोधायला बाहेर पडतात, ही माहिती माथेरानमधील सामजिक कार्यकर्ते नितीन शहा यांच्या कानी पडली. त्यांनी खोंडे गावातील जे आदिवासी तरुण रोजगार मिळवण्यासाठी शहरातील हॉटेलमध्ये काम करतात, तेथे त्‍यांची भेट घेतली. गावामध्ये पाणी नेण्यासाठी काय करावे लागेल, याची चर्चा केली. नितीन शहा यांनी कॅरिंग फ्रेंड या संस्थेला माथेरानमधील खोंडा गावातील आदिवासी लोकांची पाण्यासाठी होत असलेल्या धावपळीची माहिती दिली. त्यानंतर गावामध्ये जलवाहिनीद्वारे पाणी नेण्यात आले. या जलवाहिनीमुळे आदिवासी बांधवांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे. स्थानिकांनी यावर समाधान व्यक्त करत कॅरिंग फ्रेंड आणि नितीन शाह यांचे आभार मानले.

नळजोडणीची सुविधा
कॅरिंग फ्रेंड या संस्थेने खोंडा गावात पाणी नेण्यासाठी पाच किलोमीटरहून अधिक अंतर जलवाहिनी टाकली. त्याद्वारे झऱ्याचे पाणी ४५० लोकवस्ती असलेल्या ९५ घरांत नेले. गावामध्ये तीन ठिकाणी सिंटेक टाक्या बसवून त्यात जलवाहिनीद्वारे पाणी सोडले. स्थानिकांना पाणी सहज घेता यावे, यासाठी पाण्याच्या टाक्यांना नळ जोडणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com