matheran mini train
matheran mini trainsakal

Matheran Tourism: दिवाळी सुट्टीसाठी सजले माथेरान! मिनीट्रेनसह हॉटेल, लॉजिंग हाऊसफुल

माथेरान, ता. १५ (बातमीदार) ः थंड हवेचे ठिकाण म्‍हणून जगप्रसिद्ध असलेल्‍या माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. हिवाळी हंगामासाठी माथेरान पूर्णपणे सज्ज असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, रेस्‍टॉरन्ट चालकांकडून आकर्षक सजावट, रोषणाई करण्यात आली आहे. पुढील महिनाभर माथेरान गजबजलेले राहिली तसेच मिनीट्रेनही हाऊसफुल राहील, अशी शक्‍यता व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

आशिया खंडातील सर्वात लहान पण टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे कुठेही हॉर्नचा कर्कश आवाज नाही, प्रदूषण नाही. पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून माथेरान नावारूपाला आले आहे. त्यामुळे पर्यटक माथेरानला पसंती देतात. घनदाट उंच झाडी, लाल मातीचे रस्ते ही माथेरानची खरी ओळख. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्‍यावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्‍या या शहरात वर्षभर लाखो पर्यटक भेट देतात.

पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात माथेरानमध्‍ये जवळपास ३ लाख ६३ हजार ६१३ पर्यटक आल्‍याची नोंद झाली होती. आता हिवाळी पर्यटनास सुरुवात झाली असून पर्यटक मोठ्या संख्‍येने दाखल होत आहेत. साधारण लक्ष्मीपूजनानंतर नागरिक सहलीसाठी सहकुटुंब बाहेर पडतात. सोमवारपासून पर्यटकांचा ओघ वाढला. टॅक्सी संघटना, अश्‍वपालकांचा व्यवसाय तेजीत आहे. हॉटेल, लॉजिंग, रेस्‍टॉरंटसह लहान-मोठ्या व्यावसायिकांच्याही उत्‍पन्नातही वाढ झाली आहे.

मिनीट्रेनमुळे पर्यटनाला बहर
नेरळ-माथेरान मिनीट्रेन चार नोव्हेंबरपासून सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत मिनीट्रेनच्या सर्व फेऱ्या फुल जात आहेत. नेरळ-माथेरान मिनिट्रेनमुळे पर्यटकांची संख्या वाढल्‍याने स्‍थानिकांकडून बोलले जात आहे. तर अमनलॉज-माथेरान शटल सेवाही सध्या हाऊसफुल आहे. मिनीट्रेनमुळे पर्यटन व्यवसाय चांगलाच बहरला आहे.

माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या
१० नोव्हेंबर - १००५
११ नोव्हेंबर- २७१७
१२ नोव्हेंबर - २९९८
१३ नोव्हेंबर दुपारी २ वाजेपर्यंत ः ६०७०

माथेरानचा पर्यटन व्यवसाय दिवसेंदिवस बहरत आहे. पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते तसेच हिवाळी हंगामही तेजीत जाण्याची शक्‍यता आहे. सर्व दुकानदार प्रामाणिकपणे पर्यटकांना सेवा देतात. शिवाय येथील वातावरण पर्यटकांना आल्‍हाददायी वाटते. त्‍यामुळे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा याठिकाणी येतात.
- राजेश चौधरी,अध्यक्ष व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com