बॉक्सिंग स्पर्धेत महापालिका विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉक्सिंग स्पर्धेत महापालिका विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी
बॉक्सिंग स्पर्धेत महापालिका विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी

बॉक्सिंग स्पर्धेत महापालिका विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी

sakal_logo
By

मुंबई, ता. १ (बातमीदार) ः जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या विद्यमाने मुंबईतील सर्व भाषिक शाळांसाठी नुकतेच जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये १४ वर्षांखालील गटात पालिका शाळांतील आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावून मुंबई जिल्ह्यात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या आठ विद्यार्थ्यांची पालघर येथे होणाऱ्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्यावतीने नुकतेच जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्‍ये मुंबईतील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला. या वेळी झालेल्‍या १४ वर्षांखालील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पालिका शाळेतील या आठ विजेत्यांमध्ये धारावी टी. सी. महापालिका इंग्रजी शाळेच्या सलमान सैय्यद, मोहम्मद मन्सूर, मो. साय्यम आलम, प्रबोधनकार ठाकरे महापालिका हिंदी शाळेच्या शोषन रावत व विक्रम गौतम, वरळी नाका हिंदी शाळेचा अमन श्रीवास्तव, ग्लोबमिल महापालिका शाळेचा सार्थक पाटील आणि गिल्डर लेन महापालिका इंग्रजी शाळेच्या संगम कुमार यांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धकांना शारीरिक शिक्षण शिक्षक महाजन, राऊत, पडवळ, गणेश डहाळे यांनी बॉक्सिंगचे धडे दिले. कनिष्ठ पर्यवेक्षक सोनवणे, इंगळे, मुकुंद बैकर, वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी विजेते स्पर्धक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.