दिघा-ऐरोलीतील कोंडीवर तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघा-ऐरोलीतील कोंडीवर तोडगा
दिघा-ऐरोलीतील कोंडीवर तोडगा

दिघा-ऐरोलीतील कोंडीवर तोडगा

sakal_logo
By

वाशी, ता. १ (बातमीदार)ः नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वेस्थानकाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ऐरोली कटाई उन्नत मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम देखील ८८ टक्के पूर्ण झाले असून, तर पारसिक बोगद्याचे देखील ६६ टक्के काम झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये दिघा व ऐरोली परिसरातील रेल्वे, तसेच रस्ते मार्गावरील विविध प्रकल्प पूर्ण होणार असल्याने ऐरोली, तसेच दिघामधून वाहतूक कोंडी सुटणार आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वेस्थानकांचे काम मागील पाच वर्षापासून सुरू आहे. दिघा येथे स्थानक नसल्यामुळे रहिवाशांना ऐरोली रेल्वेस्थानक किंवा ठाणे रेल्वेस्थानकांमधून परिवहन सेवेने किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत होता. एमआयडीसीच्या कळवा झोनमधील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ऐरोली रेल्वेस्थानकांमधून रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी होती, पण दिघा रेल्वे सुरू झाल्यांनतर ऐरोली रेल्वेस्थानकावरील ताण कमी होणार आहे. तसेच रस्ते मार्गी जाणाऱ्या वाहनांसाठी ऐरोली-कटाई उन्नत मार्ग सुरू झाल्यांनतर भविष्यात ऐरोली पुलापासून रबाळे टी जंक्शनपर्यंत होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे.