पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीची आत्महत्या
पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीची आत्महत्या

पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीची आत्महत्या

sakal_logo
By

पनवेल, ता. १ (वार्ताहर) : तळोज्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने गावी गेलेल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. सचिन विजय जाधव (वय ३१) याच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे तळोजा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील होलार यांनी सांगितले.

सचिन हा पत्नी आणि दोन मुलांसह तळोजा फेज-२ मध्ये राहत होता. मुलांना ख्रिसमसची सुट्टी असल्याने त्याची पत्नी मुलांना घेऊन गावी गेली होती. यादरम्यान, शनिवारी (ता. ३१) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सचिनने पत्नीला व्हिडीओ कॉल करून मुलांना शेवटचे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याने आत्महत्या करत असल्याचे पत्नीला सांगून कॉल चालू ठेवतच घरामध्ये गळफास घेतला. या प्रकारानंतर त्याच्या पत्नीने रोहिंजण येथे राहणाऱ्या दिराला तात्काळ संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्याने सचिनच्या घरी धाव घेऊन पाहणी केली असता, तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर सचिनच्या भावाने तळोजा पोलिसांना याबाबत माहिती दिली. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्याला दारूचे व्यसन होते, यातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.