फादर स्टीफन्स स्कूलचा रौप्यमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फादर स्टीफन्स स्कूलचा रौप्यमहोत्सव
फादर स्टीफन्स स्कूलचा रौप्यमहोत्सव

फादर स्टीफन्स स्कूलचा रौप्यमहोत्सव

sakal_logo
By

विरार, ता. २ (बातमीदार) : गिरीज येथील फादर स्टीफन्स ॲकॅडमी स्कूलचा रौप्यमहोत्सवी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी शाळेचे माजी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे पालक अ‍ॅड. विकास ठाकूर, व्हिक्टर परेरा, विकास राऊत यांना निमंत्रित करण्यात आले होते. स्वागत गीतानंतर विद्यार्थ्यांनी फादर स्टीफन्स लिखित ‘ओ नमो विश्वंभर...’ ही प्रार्थना सादर करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांतर्फे सिल्व्हिया आल्मेडा (डायस) आणि करिना राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा, लेखन, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला व संगीत स्पर्धा यामधील यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून श्वेता मनोज यादव आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कौशिक बाळकृष्ण पवार यांना प्रमुख पाहुणे अ‍ॅड. विलास ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्ये सादर करून आपल्या कलेचे दर्शन घडवले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका कार्व्हालो यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, शिक्षिका सुप्रिया आल्मेडा यांनी आभार मानले.