वर्षभरात सात कोटींचा मद्यसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभरात सात कोटींचा मद्यसाठा जप्त
वर्षभरात सात कोटींचा मद्यसाठा जप्त

वर्षभरात सात कोटींचा मद्यसाठा जप्त

sakal_logo
By

डहाणू, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात परराज्यांतून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्यसाठा आणला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी पालघर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात या विभागाने सात कोटी ८६ लाखांचा मद्य साठा जप्त केला असून ८०१ आरोपीवर कारवाई केली आहे. यात ७८६ जणांना अटक करण्यात आली आहे.
गुजरात राज्यातील सिल्वासा आणि दमण येथे निर्मिती केलेल्या विदेशी मद्यावर महाराष्ट्रात बंदी आहे. असे असताना तेथील मद्य विनापरवाना वेगवेगळ्या वाहनांतून चोरट्या मार्गाने आणले जाते. गेल्या वर्षभरात उत्पादन शुल्क विभागाने एकूण सात कोटी ८६ लाखांचा विदेशी मद्य साठा जप्त केला आहे; तर ८०१ जणांवर कारवाई करून ७८६ आरोपींना अटक केली आहे. यात केवळ डिसेंबर महिन्यात एक कोटी तीन लाख ६८ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, १२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.