माहुली किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहुली किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम
माहुली किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम

माहुली किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम

sakal_logo
By

खर्डी, ता. २ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात असलेल्या माहुली किल्ल्यावर छत्रपती शिवरायांवर शिवगर्भ संस्कार झाले, अशी इतिहासात नोंद आहे. ऐतिहासिक महत्त्‍व लाभलेल्या या किल्ल्याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असून, या किल्ल्यावर दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी कोणतीही व्यवस्था निदर्शनास येत नाही. या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या किल्ल्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शंभुदुर्ग प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी माहुली किल्ल्यावर नववर्षाच्या स्वागतार्ह किल्ले संवर्धन मोहिमेचे आयोजन करते.
शंभुदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेने माहुली किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहिमेच्‍या आयोजनाद्वारे किल्ल्यावर सुरक्षित रस्ते तयार करून पौराणिक वास्तूंची स्वच्छता केली. गडावर येणाऱ्या पर्यटकांना गड चढतांना रस्त्यांची माहिती व्हावी, यासाठी दिशादर्शक फलक लावून भगवा ध्वज उभारला. सरकारने गडकिल्ले संवर्धनात सामाजिक संस्थांना कोणतीही मनाई करू नये अन्यथा आंदोलन करण्‍याचा इशारा महासचिव संजय चौधरी यांनी दिला.
--------------------------------
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकोट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रतिबंध न करता, वनविभागाच्या जाचक अटी रद्द करून, गट संवर्धन करण्याबाबत अधिकार द्यावेत व वनअधिकाऱ्यांना समज देण्यात यावी. जेणेकरून गडावर स्वच्‍छता राहील.
-संजय चौधरी, महासचिव, शंभुदुर्ग प्रतिष्ठान.