ठुणे यात्रेत भाविकाची मांदियाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठुणे यात्रेत भाविकाची मांदियाळी
ठुणे यात्रेत भाविकाची मांदियाळी

ठुणे यात्रेत भाविकाची मांदियाळी

sakal_logo
By

किन्हवली, ता. २ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील शेणवेजवळील ठुणे यात्रोत्सवाच्या आज (ता. २) पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आमदार दौलत दरोडा यांनी पहाटे श्रींचा महाभिषेक केल्यानंतर यात्रोत्सवास सुरुवात झाली.

शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा ठुणे यात्रोत्सवास मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली. यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली आहेत. गृहोपयोगी साहित्य, खेळणी, आकाशपाळणे, गोष्टींची पुस्तके, धार्मिक ग्रंथ, भजनाचे साहित्य, मिठाई, फळे, कपडे, प्रसाद, शृंगार साहित्य, उपाहाराचे स्टॉल लागले आहेत. दर्शनानंतर या स्टॉलवर खरेदीसाठी भाविक गर्दी करत असल्याचे चित्र होते. विठ्ठल-रखुमाई मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टमार्फत भेटी देणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नवस फेडण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.