
मुंबईत सावित्री उत्सवाची रेलचेल
मालाड, ता. २ (बातमीदार) ः नव्या वर्षातील पहिला उत्सव अशी ओळख असलेला सावित्री उत्सव उद्या (ता. ३) होत आहे. यंदा मुंबईत दहा ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे. शेणा, दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. त्यांची आठवण कायम राहावी यासाठी दारात कंदील, दरवाजाला फुलांचे तोरण आणि उंबऱ्यावर ज्ञानाची एक पणती लावून, सोबत एक पुस्तक विकत घेऊन हा उत्सव घराघरांत साजरा करा आणि संध्याकाळी आपल्या भागात होणाऱ्या सावित्री उत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी केले आहे.
येथे उत्सव
राष्ट्र सेवा दल, काचपाडा नंबर १, मालाड (पश्चिम),
चेंबूर घाटला व्हिलेज,
बर्वे नगर, घाटकोपर, (पश्चिम)
आत्मनिर्भय फाऊंडेशन, विकास नगर, बेहराम बाग, जोगेश्वरी,
नवजवान क्रीडा मंडळ, मुक्तादेवी वाडी, चुनाभट्टी, सायन,
आदर्श विद्यालय, नरदास नगर,भांडुप,
निर्मित एड्युसोल प्रा. लि.,
राष्ट्र सेवा दल, सातरस्ता,
सफल विकास वेल्फेअर सोसायटी, मालवणी, मालाड,
समता विद्या मंदिर, मोहिली व्हीलेज, साकीनाका