जिजामाता प्राणिसंग्रहालयातील कामाचा आम्हाला अभिमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजामाता प्राणिसंग्रहालयातील कामाचा आम्हाला अभिमान
जिजामाता प्राणिसंग्रहालयातील कामाचा आम्हाला अभिमान

जिजामाता प्राणिसंग्रहालयातील कामाचा आम्हाला अभिमान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राजकारणातील मंडळींकडून जिजामाता उद्यानातील प्राण्यांच्या नावावरून मला चिडवले जायचे; परंतु हा द्वेष करणाऱ्यांनी नुकताच जिजामाता उद्यानाला भेट देणाऱ्यांचा आकडा पाहावा. मुंबई महापालिकेच्या मदतीने जिजामाता प्राणिसंग्रहालयात मी आणि उद्धवजींनी जे साध्य केले आहे, त्याचा अभिमान वाटतो, असे ट्विट युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे वर्षाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या रेकॉर्डब्रेक पर्यटकांचा आकडा शेअर करत आदित्य ठाकरेंनी हे ट्विट केले आहे.
महापालिकेच्या भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला रविवारी (ता. १) अर्थात इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३२ हजार ८२० इतक्या पर्यटकांनी भेट दिली. या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा एकाच दिवशी पर्यटकभेटीचा ६ नोव्हेंबर २०२२ चा विक्रम मागे टाकून या प्राणिसंग्रहालयाने आपल्या शिरपेचात नवीन तुरा खोवला आहे. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी ३१ हजार ८४१ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती. त्या दिवशी सुमारे ११ लाख १२ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न महापालिकेच्या तिजोरी जमा झाले होते. रविवारी सुमारे १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले.