ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

sakal_logo
By

ठाणे, ता. २ : अदानी इलेक्ट्रिक कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराला कायम करावे, तिन्ही वीज कंपन्यातील ४२ हजार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, आदी मागण्यांसह अन्य समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सोमवारी दुपारी १२ वाजता महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालय ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी १५ हजाराहून अधिक वीज कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. मोर्चाला सुरुवातीला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात संघर्ष समितीचे नेते डॉ. संदीप वंजारी, सचिन शिंदे, कृष्णा भोयर, संजय ठाकूर, अरुण पिवळ, संजय मोरे, आदी पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.