केतकी चितळेचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केतकी चितळेचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
केतकी चितळेचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

केतकी चितळेचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

sakal_logo
By

मुंबई, ता. २ ः ‘इंग्रजी परंपरा पाळू नका असे मी कधी म्हटले? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात मद्य आहे. आमचे देव मद्य पितात,’ अशी वादग्रस्त विधाने केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा चर्चेत आली आहे.
मागील वर्षी तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला तुरुंगामध्ये जावे लागले होते. वर्षभर ती प्रचंड चर्चेत होती. आता तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तिच्या हातात मद्याचा ग्लास आहे आणि ती सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. एकाने आपल्या कमेंटमध्ये म्हटले, ‘लोकांना सांगायचे इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण मात्र ढोसायचे.’ नेटकऱ्याच्या या ट्रोलिंगला तिने आक्रमक उत्तर दिले आहे. नेटकऱ्यांना उत्तर देताना ती म्हणते की, ‘इंग्रजी परंपरा पाळू नका असे मी कधी म्हटले? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात मद्य आहे. आमचे देव मद्य पितात. कालीमातेला मद्याचा नैवेद्य दाखवतात, तसेच काही शंकर मंदिरातही दखवतात. स्वत:ची संस्कृती शिका हे मी लिहिते आणि कायम सांगते’, असे उत्तर तिने दिले आहे. यावर नेटकऱ्याने माघार घेत अतिशय छान माहिती, असा रिप्लाय केला आहे.