जूचंद्र सेवा मंडळाच्या वर्धापनादिनी ५०० आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जूचंद्र सेवा मंडळाच्या वर्धापनादिनी ५०० आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप
जूचंद्र सेवा मंडळाच्या वर्धापनादिनी ५०० आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप

जूचंद्र सेवा मंडळाच्या वर्धापनादिनी ५०० आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप

sakal_logo
By

विरार, ता. ३ (बातमीदार) : सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात पालघर तालुक्याच्या वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, शहापूर, डहाणू इत्यादी तालुक्याच्या दुर्गम भागात कार्य करणाऱ्या जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाने १ जानेवारीला मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनी विक्रमगड तालुक्यातील ५०० आदिवासी कुटुंबांना धान्य, ब्लॅंकेट, साड्या व आश्रमशाळा माण येथील ४५० विद्यार्थ्यांना अन्नदान करून वर्धापन दिन साजरा केला. श्री परशुराम आणि सामळनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजेश त्रिवेदी व मुकेश त्रिवेदी यांच्या हस्ते विक्रमगड तालुक्यातील कापरीचापाडा, भंडारपाडा, भुजाडपाडा, लोखंडेपाडा, पाटीलपाडा, दातीलपाडा, ठाकरेपाडा या पाड्यातील ५०० महिलांना प्रत्येकी दोन साड्या, ब्लॅंकेट, तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, तेल, मीठ, मसाला, हळद, साखर, चहा, पोहे, साबण इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांच्या ७२ व्या जन्मदिनानिमित्त पाटील परिवारातर्फे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण येथील ४५० विद्यार्थ्यांना पुरणपोळीचे गोड जेवण देण्यात आले. त्याचवेळी सामुदायिक विवाहात सहभागी होणाऱ्या २४ जोडप्यांना पुरुषोत्तम पाटील हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.