पालिकेच्या वर्धापनदिनी गुणवंतांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या वर्धापनदिनी गुणवंतांचा गौरव
पालिकेच्या वर्धापनदिनी गुणवंतांचा गौरव

पालिकेच्या वर्धापनदिनी गुणवंतांचा गौरव

sakal_logo
By

वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त दर वर्षी अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोविड कालावधीनंतर दोन वर्षांनी एकत्रित येऊन या वर्षीचा वर्धापन दिन अधिकारी, कर्मचारी यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत जल्लोषात साजरा केला.
विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या ३१ व्या वर्धापनदिन समारंभात होम मिनिस्टर, वैयक्तिक गायन व नृत्य स्पर्धा, समूह गायन, समूह नृत्य, एकपात्री नाट्य, नकला, वादन, कविता वाचन, महिला कर्मचार्‍यांसाठी रांगोळी, पाककला, संगीत खुर्ची त्याचप्रमाणे क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कॅरम, बुद्धिबळ, धावणे, लांब उडी, गोळाफेक अशा मैदानी व बैठ्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. आकर्षित ठरलेल्या आंतर क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाचा पाच वर्षांचा विक्रम मोडीत काढत विजयी कोपरखैरणे विभाग कार्यालय संघाने यंदाच्या क्रिकेट स्पर्धेवर आपली मोहर रोवली आहे.
समारंभात सर्वोत्कृष्ट कलाविष्कारांना मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, प्रशासन विभागाचे उप आयुक्त नितीन नार्वेकर, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, पालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, सहायक आयुक्त चंद्रकांत तायडे, विभाग अधिकारी दत्तात्रय घनवट, महेंद्र सप्रे, प्रशांत गावडे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.