जिजाऊ शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजाऊ शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जिजाऊ शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिजाऊ शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ३ (बातमीदार) : जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झडपोली या शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव केला. या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.