जव्हारमध्ये वीज कर्मचारी आजपासून संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये वीज कर्मचारी आजपासून संपावर
जव्हारमध्ये वीज कर्मचारी आजपासून संपावर

जव्हारमध्ये वीज कर्मचारी आजपासून संपावर

sakal_logo
By

जव्हार, ता. ३ (बातमीदार) : राज्य सरकारने महावितरणच्या खासगीकरणाचा घाट घातल्या आरोप करत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या खासगीकरणाचा विरोध करण्यासाठी ३ जानेवारीपासून राज्यभर अधिकारी, अभियंते व कर्मचारी ७२ तास कामबंद आंदोलन करणार आहेत. यात जव्हार महावितरण कार्यालयातील ३३ अभियंते व कर्मचारी वीज कर्मचारीही उद्यापासून (ता. ४) सहभागी होणार असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी उप अभियंता विवेक तळणीकर यांनी दिली.
महावितरणच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ४, ५, ६ जानेवारीला ७२ तासांचा संप, १८ जानेवारी २०२३ चे शून्य तासापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण धोरण बंद करा, महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देवू नका. कंत्राटी, आउटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा, आदी मागण्यांसाठी राज्यभर द्वार सभा व निदर्शने करण्यात येत आहेत. त्यात संघर्ष समितीने ४ जानेवारीपासून संपावर जाण्याचे ठरविले आहे.