जीवनदीप महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनदीप महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
जीवनदीप महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

जीवनदीप महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

sakal_logo
By

टिटवाळा, ता. ४ (बातमीदार) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत जीवनदीप महाविद्यालय गोवेलीमधील महिला विकास मंच विभागाकडून ‘जीवनज्योती’ सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी परिसरातील कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या कलागुणांना बळ मिळावे व त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने महिला सरपंच, उपसरपंच व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना ‘जीवनज्योती’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते स्त्री-शिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी विद्यार्थिनी सुप्रिया गायकवाड हिने भाषण; तर प्रीती मोहिते हिने एकपात्री नाटक सादर केले. प्रा. जया देशमुख यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, प्रा. जया देशमुख, प्रा. काकडे, प्रा. स्नेहा भोंडीवले, प्राध्यापक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
.....................
गौरवमूर्ती
जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या हस्ते गटशिक्षण अधिकारी रुपाली खोमणे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती जगताप, वैद्यकीय अधीक्षक माधवी पंधारे, आरोग्य अधिकारी पूनम जयकर, सरपंच अलका शेलार, कांता टेंभे, गीता शिसवे, ज्योत्स्ना मुकणे, कल्पना टेंभे, पूजा जाधव, करिश्मा सुरोशी, करिश्मा शेलार, दीपाली बुटेर, उपसरपंच किशोरी भोईर, रेणुका चौधरी, रोशनी धुमाळ, मीना हरड, सविता मिरकुटे, प्रतिभा जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.