सावित्रीबाईंमुळे स्त्रीशिक्षणाची बीजे रुजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाईंमुळे स्त्रीशिक्षणाची बीजे रुजली
सावित्रीबाईंमुळे स्त्रीशिक्षणाची बीजे रुजली

सावित्रीबाईंमुळे स्त्रीशिक्षणाची बीजे रुजली

sakal_logo
By

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : ब्रिटिश कालखंडामध्ये समाजातील प्रवृत्ती महिला शिक्षणविरुद्ध होती. अशाही परिस्थितीत समाजातील वाईट, अनिष्ट रुढी, प्रथा या फुले दाम्पत्याने मोडीत काढण्यासाठी समाजाच्या विरोधाला झुगारले आणि स्त्री शिक्षणाची बीजे रुजवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे महिला शिक्षणाने स्वयंशिक्षित होत गेल्या, असे प्रतिपादन भिवंडी-निजामपूर शहर महागनरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले. गाजेंगी हॉल, कोंबडपाडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष वंदना शिंदे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ‘समाज घडवताना’ नावाचा चित्रांजली क्रिएशन निर्मित एक लघुपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त तथा सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी केले. या वेळी सहायक आयुक्त (आरोग्य) प्रीती गाडे, नितीन पाटील, डॉ. बुशरा सय्यद, जगदीश जाधव, या कार्यालयातील महिला कर्मचारी उपस्थित होत्या.