शेलारी गावात हरिनाम सोहळा उत्‍साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेलारी गावात हरिनाम सोहळा उत्‍साहात
शेलारी गावात हरिनाम सोहळा उत्‍साहात

शेलारी गावात हरिनाम सोहळा उत्‍साहात

sakal_logo
By

मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील शेलारी गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर समिती, ग्रामस्थ मंडळ शेलारी, दहिगाव व परिसर यांच्या वतीने ३० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत सद्गुरू गजानन महाराज जोशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
सप्ताहाचे उद्‌घाटन मुरबाड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार गोटीराम पवार यांच्‍या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्‍ज्वलन योगी फुलनाथ महाराज यांनी केले. कलशपूजन ज्ञानेश्वर भोईर व लाडकू महाराज सोलसे यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे उपस्थित होते.
जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती महास्वामी संकेश्वर पीठ, बेळगाव, कर्नाटक, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्य उल्हास बांगार, रेखा कंटाळा, पंचायत समिती सदस्य अनिल देसले आदींनी सोहळ्यास भेट दिली.

काल्याचे कीर्तन
दररोज पहाटे चार ते सहा या वेळेत काकड आरती व राजू महाराज घावट श्रीक्षेत्र आळंदी यांची प्रवचने, सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ज्ञानेश्र्वरी पारायण, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, रात्री ९ ते ११ या वेळेत भगीरथ महाराज काळे, सोपान महाराज पहाणे, प्रसाद महाराज गडदे, योगीराज महाराज गोसावी बीड यांनी कीर्तन सादर केले. शेवटच्या दिवशी अमृत महाराज गोसावी यांचे काल्याचे कीर्तन झाले.
--------------------
मुरबाड : तालुक्यातील शेलारी येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळ्यास जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती महास्वामी संकेश्वर पीठ, बेळगाव, कर्नाटक यांनी भेट दिली.