सैन्य दलातील जवानावर विनामूल्य शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैन्य दलातील जवानावर विनामूल्य शस्त्रक्रिया
सैन्य दलातील जवानावर विनामूल्य शस्त्रक्रिया

सैन्य दलातील जवानावर विनामूल्य शस्त्रक्रिया

sakal_logo
By

बोर्डी, ता. ४ (बातमीदार) : दिल्ली येथे सैन्य दलात कार्यरत असलेल्या २४ वर्षीय रिकी दूर या जवानाची दक्षिण गुजरात मधील दहेली जवळील श्रीजी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राजेश श्रीवास्तव यांनी लेप्रोस्कोपीद्वारे कोसलेक्टोनोमी आजारावर यशस्वी आणि विनामूल्य शस्त्रक्रिया केली. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर रिकी दूर यास डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्ली येथे कर्तव्य बजावताना आर्मी जवान विकी दूर कोसलेकटोमीच्या आजाराने ग्रस्त होता. तेथील स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या शस्त्रक्रियेसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च येणार होता. परंतु रिकी दूर याल वरिष्ठांनी दक्षिण गुजरातमधील वापी जवळील दहेली गावात असलेल्या श्रीजी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्यांनी डॉक्टर राजेश श्रीवास्तव यांची भेट घेऊन २६ डिसेंबर रोजी त्याच्यावर लेप्रोस्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी बाजी लावणाऱ्या जवानावर विनामूल्य शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी सैनिकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त केली.