Tue, Jan 31, 2023

नवी मुंबईत दोन महिलांची हत्या
नवी मुंबईत दोन महिलांची हत्या
Published on : 4 January 2023, 2:23 am
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नवीन वर्ष सुरू होताच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल आणि उरणमध्ये दोन महिलांच्या हत्येची घटना घडली. या दोन्ही प्रकरणांतील आरोपी फरारी आहेत. पनवेल तालुक्यातील भिंगारगाव भेरलेवाडी येथे ३१ डिसेंबरला मध्यरात्री तारा कातकरी (४५) या महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील ललिता ऊर्फ लीलाबाई ठाकूर (५७) या महिलेची तिच्याच भाडेकरूने हत्या करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. अमोल शेलार असे त्याचे नाव आहे.