राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : डोंबिवलीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ कार्यकर्त्यांच्या हातावर शिवबंधन बांधत या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संघटनात्मक शक्तीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यामध्ये राहुल चौधरी, राजेंद्र नांदोस्कर, जगदीश ठाकूर, प्रशांत शिंदे, शैलेश गवळी, अर्जुन भाटी, देवा चुडनाईक, रतन चव्हाण, राजेंद्र चौधरी, रोहित चौधरी, अभिषेक खामकर, संजय पाटील, प्रदीप तेरसे, मधू शेळके या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यासह त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष भोईर, खासदार अरविंद सावंत, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आदी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडीत असून, संघटनात्मक शक्ती असलेल्या या पक्षात प्रवेश केल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.