शाळा प्रवेशद्वार नुतनीकरणात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा प्रवेशद्वार नुतनीकरणात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
शाळा प्रवेशद्वार नुतनीकरणात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

शाळा प्रवेशद्वार नुतनीकरणात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

sakal_logo
By

कांदिवली, ता. ५ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेला बजाज महापालिका शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या कामात दिरंगाई होत असल्याने, पालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. खड्डे, रेती माती व खडीचे ढिगारे यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर कामामध्ये सुरक्षितता नसल्याची खंत पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
कांदिवली पश्चिम येथे स्टेशनजवळच महापालिकेची बजाज रोड शाळा आहे. या शाळेत मराठी, हिंदी आणि गुजराती माध्यमचे प्राथमिक व माध्यमिक असे सहा विभाग आहेत. या शाळेच्या बाहेर मुख्य मार्गावर बस स्थानके व रिक्षा थांबे आहेत. मुख्य मार्गावरील प्रवेश द्वाराचे नूतनीकरण करण्याचे काम पालिकेच्या वतीने गेले दोन महिन्यांपासून आहे. यासाठी शाळेचा लोखंडी गेट बाजूला काढून, पिलरसाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला शाळेचे मोठे मैदान आहे. विद्यार्थी सातत्याने ये-जा करत असतात. शाळेचे आतील प्रवेशद्वार आणि मैदानामधील मार्गावरच काम सुरू आहे. पालिका अधिकारी, शाळा व्यवस्थापनाने सुरक्षिततेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना राबवल्या नसल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत.

प्रवेशद्वारावर लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत. विद्यार्थी दुसऱ्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात. त्यातूनही सुरक्षिततेसाठी काही सूचना असल्यास अधिकाऱ्यांना सांगून करून घेऊ.
- मीना कवळे, मुख्याध्यापिका