शिवळे महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धे साठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवळे महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धे साठी निवड
शिवळे महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धे साठी निवड

शिवळे महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धे साठी निवड

sakal_logo
By

मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : शांताराम भाऊ घोलप कला व विज्ञान आणि गोटिराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळेमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींची अहमदनगर येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिवळे महाविद्यालयातील कोमल सुनील देसाई या विद्यार्थिनींची ५३ किलो वजनी गटात; तर भाग्यश्री हनुमंत गडकर या विद्यार्थिनीची ७६ किलो वजनी गटात मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली आहे. अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धा, कर्जत जिल्हा, अहमदनगर येथे ६ ते ९ जानेवारी या कालावधीत होणार आहेत. या विद्यार्थिनींच्‍या निवडीबद्दल मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार गोटिराम भाऊ पवार यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयांच्या प्रभारी प्राचार्या डॉ. गीता विशे, जिमखाना प्रमुख प्रा. बाळासाहेब आहेर, क्रीडा प्रशिक्षक मदन गायकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
-------------------------
मुरबाड : तालुक्यातील शिवळे महाविद्यालयातील कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थिनींचे आमदार किसन कथोरे यांनी अभिनंदन केले.