कळव्यातील विज्ञान प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यातील विज्ञान प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
कळव्यातील विज्ञान प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

कळव्यातील विज्ञान प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

कळवा, ता. ५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक विचाराची कास व दृढ भावना निर्माण व्हावी; विविध संशोधनाची ओढ निर्माण व्हावी या हेतूने कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ३ ते ४ जानेवारी यादरम्यान दोन दिवसांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेले जवळपास ७० ते ८० विविध प्रकल्प मांडण्यात आले. अकरावी विज्ञान शाखेच्या भूमिका, पूर्वा, मंथन, आयुष या विद्यार्थ्यांनी त्यांची शिक्षिका वैशाली कोंडकर व प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चीनच्या धर्तीवर भारतातही भविष्यात इंधन बचत करणारे व प्रदूषण कमी करणारे हायड्रॉलिक ब्रीज तयार केले. माध्यमिक विज्ञान शिक्षिका अनधा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्राची खोली मोजण्यासाठी ध्वनीने परावर्तित होणाऱ्या सेन्सरला साऊंड असणारे सोनार सिस्टम यंत्र तयार केले. याचबरोबर नदीतील गाळ काढणारे रिव्हर क्लीनर, आपोआप कचरा ओढून घेणारा स्मार्ट डस्टबिन, रेन हार्वेस्टिंग, स्मार्ट सिटी यांसारखे अनेक प्रयोग व प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले होते. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कळवा हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका विनया केदारे, विज्ञान समिती प्रमुख अनंधा पाटील, संजय गायकवाड, ज्योती मरभळ व विज्ञान शिक्षकांनी मेहनत घेतली.