सायरस मिस्त्री अपघातप्रकरणात आरोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायरस मिस्त्री अपघातप्रकरणात आरोपपत्र दाखल
सायरस मिस्त्री अपघातप्रकरणात आरोपपत्र दाखल

सायरस मिस्त्री अपघातप्रकरणात आरोपपत्र दाखल

sakal_logo
By

कासा, ता. ५ (बातमीदार) : टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणात पालघर पोलिसांनी डहाणू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. गुजरातमधील उद्धवाडा येथून धार्मिक कार्य आटोपून परतत असताना पालघरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटीजवळील सूर्या नदी पुलाच्या कठड्याला भरधाव मर्सिडीज कार धडकल्याची घटना ४ सप्टेंबरला दुपारी घडली होती. या अपघातात सायरस मिस्त्री तसेच जहांगीर पंडोल यांचे निधन झाले होते; तर दरायस व डॉ. अनाहिता पंडोल जखमी झाल्या होत्या.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, मर्सिडीज बेंझ कंपनीच्या तांत्रिक तपासणी अहवालानंतर, तसेच चौकशी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर हयगयीने भरधाव वाहन चालवण्याच्या व धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. याप्रकरणी डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता डहाणूचे उपविभागीय अधिकारी संजीव पिंपळे यांनी सुमारे १५२ पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये न्यायवैद्यक, विविध विभागांचा अहवाल, घटनास्थळी असणाऱ्यांचे जाबजबाब, वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीचा तपासणी अहवाल जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.