Tue, Jan 31, 2023

रत्नागिरी बोट दुर्घटनेतील दोघांवर अंत्यसंस्कार
रत्नागिरी बोट दुर्घटनेतील दोघांवर अंत्यसंस्कार
Published on : 5 January 2023, 3:46 am
कासा, ता. ५ (बातमीदार) : रत्नागिरीजवळील समुद्रात बोट बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावंडांवर आज तलासरीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुजरातमधील मंगलोर बंदरावरील ‘रत्नसागर’ बोट रत्नागिरीजवळील समुद्रात ३ जानेवारीला बुडाली होती. या बोटीत एकूण सात खलाशी होते. पैकी ४ खलाशी मच्छीमारांना वाचविण्यात यश आले होते; तर दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील एकजण अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. बोटीवरील सर्व खलाशी तलासरी तालुक्यातील पाटकर पाडा येथील आहेत. दुर्घटनेतील सुरेश वळवी आणि लक्ष्मण वळवी या दोघांचे मृतदेह गुरुवारी सकाळी तलासरीत आणण्यात आले. तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले, मंडळ अधिकारी कुमार कुंडारे, उप निरीक्षक जयराम उमतो यांच्या उपस्थितीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.